देवराज अर्स कॉलनी येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता देवराज अर्स कॉलनी येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.
बसवण कुडची देवराज अर्स कॉलनी येथील रहिवाशांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. या ठिकाणी रस्ते गटारी पथदीप पाण्याची टाकी यासह अनेक गोष्टींचा अभाव असल्याने आपल्या मागणीसाठी रहिवाशांनी निवेदन दिले आहे.
या ठिकाणी देवराज अर्स कॉलनी पासून बायपास रस्ता बांधणे राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग बॉम्बे कॉलनीच्या दुतर्फा शिवालय मंदिराच्या शेजारी देवराज अर्स कॉलनी येथे रस्ता बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच या गावाला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी देवराज अर्स कॉलनीमध्ये एक लाख लिटर क्षमतेची स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून देण्याची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याच बरोबर मंदिरे तलाव स्मशानभूमी या ठिकाणी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे निवेदन देण्यात आले आहे .