श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सांगाव व ग्रामस्थांच्या पुढाकाराने सांगाव येथे भव्य शिवस्मारक निर्माण केले आहे .त्याला एक वर्ष पूर्ण झाले असून त्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात पार पडला .
यावेळी भरगच्च कार्यक्रमाच्या माध्यमातून पोवाडा, किर्तन, व महाप्रसाद असे वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते शिव मूर्तीचे पूजन करण्यात आले .तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले असून हजारो शिवप्रेमींनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला.