तिसऱ्या रेल्वे गेट वरील उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे सदर काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असून गर्डर बसविण्याचे काम देखील यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
शनिवारी तब्बल तीनशे वीस टनाचा गर्डर उड्डाणपुलावर यशस्वीरित्या बसविण्यात आला. तत्पूर्वी शुक्रवारी गर्डर बसविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता.
याआधी उड्डाणपुलावर गर्डर बसविताना अनेक अडचणी आल्या. मात्र सर्व अडचणींवर मात्र करून यशस्वीरित्या शनिवारी गर्डर बसविण्यात आला. गर्डर बसविण्याचे काम खूप आव्हानात्मक होते. परंतु या आव्हानाला तोंड देत सदर काम पूर्ण करण्यात आले.
इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचे कंत्राट घेतले आहे. तसेच 2019साली या कामाची सुरुवात करण्यात आली होती .
सध्या येथील काम हळूहळू पूर्ण होत असून लवकरच आपल्या सेवेत उड्डाणपूल असेल तसेच सदर उड्डाणपूल बनविण्याकरिता कंपनीने कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवला असून किमान 100 वर्षे हा पूल टिकून राहील असा विश्वास देखील कंपनीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.