चैत्र पौर्णिमेला कोल्हापूर येथे ज्योतिर्लिंग यात्रा भरते. या यात्रेसाठी चव्हाट गल्ली येथील देव दादा इराप्पा दादा ही मानाची सासन काठी आणि नार्वेकर गल्ली येथील ज्योतिबाची पालखी आज रवाना झाली .यावेळी सायंकाळी 6 वाजता नार्वेकर गल्ली येथून पालखी आणि बैलगाड्या रवाना झाल्या तर रात्री नऊ वाजता चव्हाट गल्लीतील देव घरापासून सासनकाठी बैलगाड्या आणि जोतिबा भक्त पायी रवाना झाले
यावेळी दोनशे ते तीनशे अधिक नागरिक चालत बैलगाड्या मधून कोल्हापूर येथील जोतिबा यात्रेसाठी निघाले. दिनांक 12 रोजी कामदा एकादशी दिवशी सासनकाठी डोंगरावर पोहोचेल त्यानंतर दिनांक 15 रोजी रात्री दवणा 16 रोजी मुख्य पालखी सोहळा होणार आहे. तसेच त्याच दिवशी परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
तसेच दिनांक 21 रोजी शिवबसव नगर येथील देव दादा मठ आणि कोल्हापूर सर्कल येथे आंबील घुगऱ्या ची यात्रा व महाप्रसाद होणार आहे .तर सायंकाळी पाच वाजता शिवबसव नगर ते चव्हाट गल्लीपर्यंत मानाची सासनकाठी वाजत-गाजत मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच चन्नम्मा सर्कल पासून ते नार्वेकर गल्ली पर्यंत ज्योतिबाची पालखी आणि बैलगाडयांची मिरवणूक काढण्यात येणार आहे .त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 22 एप्रिल रोजी दोन्ही मंदिरांमध्ये काळभैरवाची पूजा व प्रसाद वाटपाने सांगता होणार आहे.