मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची महत्त्वाची बैठक रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी बोलविण्यात आली आहे. बेळगावच्या पारंपारिक शिवजयंती उत्सवाला संपूर्ण देशात एक महत्त्व आहे.
पण कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या चित्ररथ मिरवणूक खंडित झाल्या होत्या.पण आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने शिवप्रेमीमध्ये उत्साह संचारला आहे.
त्यामुळे रामलिंग खिंड गल्ली येथील जत्ती मठ देवस्थान येथे 10 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीस शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.