किणये येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव उपस्थित होते .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण झाल्यावर पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
याप्रसंगी थोरराष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला उपस्थित अनेक मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी इस्लामचा चांगला अभ्यास केला होता. छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल संघटक होते,म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात ते यशस्वी झाले. आपण आपला इतिहास केव्हाही विसरता कामा नये इतिहासावरूनच भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज बांधून सावध राहणे आणि हिंदूंनी संघटित राहणे ही काळाची गरज आहे. असे ते म्हणाले या कार्यक्रमाला किणये व पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त महिला मोठया संख्येने उपस्थित होते.