खानापूर तालुक्यातील दोन अधिकार्यांची पदोन्नती बदली करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करून त्यांना शाल पुष्पहार आणि फळे आणि भेटवस्तू देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
येथील विविध भागात ग्राम लेखापाल म्हणजे तलाठी म्हणून काम पाहिलेले संदीप पवार यांची एटीसी पदी बेळगाव वक्फ बोर्डाच्या कार्यालयात बढतीपर बदली झाली आहे.तसेच तलाठी मारुती चोटन्नावर यांची एफडीसी म्हणून बैलहोंगल प्रांताधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.
या दोघांनीही खानापूर तालुक्यात विविध भागात उत्तम काम करून जनसेवा केली. त्यामुळे त्यांचा खानापूर सत्कार करून दोघांना निरोप देण्यात आला. तसेच पुढील कार्यासाठी आणि सेवेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी या निरोप समारंभ कार्यक्रमात उप तहसीलदार कल्लापा कोलकार आर एस बागवान, मोशिम दर्गा वाले विनायक वेंगुर्लेकर सादिक पाच्छापुरी वीरेश पाटील शशिकला कुंदगोळ यांच्यासह इतर उपस्थित होते