मराठा समाजाच्या गोसावी मठ बेंगलोरचे 7 वे मठाधीश परमपूज्य वेदांतचार्य काशी पंडित श्री मंजुनाथ स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा बेंगलोर येथे नुकताच पार पडला. त्यांच्यासाठी येत्या 15 आणि 19 मे रोजी अनुक्रमे बेळगाव व खानापूर येथे आयोजित ‘गुरुवंदना’ कार्यक्रमास मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन भाजप व मराठा समाजाच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले आहे.
गोसावी मठ बेंगलोरचे सातवे मठाधीश परमपूज्य श्री मंजुनाथ स्वामी यांच्यासाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या सोमवार दि. 15 मे रोजी गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खानापूर येथे क्षत्रिय मराठा समाजातर्फे गुरुवार दि. 19 मे रोजी स्वामीजींचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना बेळगाव जिल्ह्यातील मराठा बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे .