बॉक्साईट रोडवरील कोयला हॉटेलजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने काही उपनगरात आज बुधवारी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार
असल्याची माहिती एलॲण्डटी कंपनीने पत्रकाद्वारे दिली आहे.
अशोकनगर पहिला ते सातवा क्रॉस, वीरभद्रनगर पहिला ते आठवा कॉस, फारुख कॉलनी, अहमदनगर, जेल कॉलनी या भागात आज बुधवारी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. आज जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण
झाल्यानंतर गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, असे कळविण्यात आले आहे