बंगळूर-मुंबई मार्गावर आणखी एक सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
कर्नाटकातील प्रवाशांची गरज लक्षात घेता नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर मंत्री वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नवीन सुपरफास्ट रेल्वे तुमकूर, दावणगेरी, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगावमार्गे धावेल. यामुळे बेळगावसह राज्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांचा मुंबई आणि बंगळूर शहराशी थेट संपर्क होईल. संबंधित अधिकाऱ्यांना नवीन रेल्वे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वेमंत्री वैष्णव यांची बंगळूर-मुंबई मार्गावर ‘सुपरफास्ट’ सुरु करण्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोर्शीकडे मागणी



