बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. याचे अध्यक्षपदी पत्रकार व कवी शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सन्मानिय विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीयसंस्थापक अध्यक्ष शरद गोरे उपस्थित राहणार आहेत .अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे कर्नाटकात राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील व बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांनी दिली आहे .