रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन
बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
संमेलनाचे उदघाटक आप्पासाहेब गुरव हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. मराठी भाषा व संस्कृतीसाठी कार्य करणारे हे व्यक्तिमत्त्व असून त्यांनी मराठा मंदिराच्या माध्यमातून भव्य प्रमाणात जिजाऊ जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला आहे. शिक्षणासाठी अनेक होतकरू विद्यार्थ्याना ते दरवर्षी आर्थिक मदत करीत असतात. सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात. मराठी व मराठा समाजाच्या संस्थांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मराठा मंदिर सांस्कृतिक भवनचे ते अध्यक्ष असून सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी मराठा मंदिरच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आहे.