उन्हाळ्यात सर्वांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच शेतकऱ्यांना देखील या उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी घालण्याकरीता आणि जनावरांना पाणी पाजण्याकरिता पाणी कमी पडत आहे. त्यामुळे हिडकल जलाशयातून घटप्रभा वरील कालव्यात 2 हजार क्युसेक पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभाग मुख्य अभियंता यांच्या कार्याला घेराव घालून केली.
पाण्याविना शेतकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहिरींनी देखील तळ गाठला आहे. तसेच जनावरांना देखील पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शहराच्या अनेक भागात आणि तालुक्यातही ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच गोकाक आणि मुडलगी येथील शेतकऱ्यांना तर पाण्यासाठी दाही दिशांना वणवण करावी लागत आहे.
त्यामुळे ही समस्या सोडविण्याकरिता शेतकऱ्यांनी आज पाटबंधारे विभाग मुख्य अभियंता यांच्या कार्याला घेराव घालून हिडकल जलाशयातून घटप्रभा वरील कालव्यात दोन हजार क्युसेक पाणी सोडावे अशी मागणी केली.