बेळगावच्या शहरात कायमचे चर्चेत असलेले ॲथलेटि धोंडीराम व सुरेश यांनी नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी की अमृत महोत्सव यांच्या वतीने खेलो मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच नाव मास्टर्स मध्ये कोरले आहे.
नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धोंडीराम शिंदे (हिंडलगा) 75 वर्षावरील गटात 800 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
याचबरोबर सुरेश देवरमनी( उचगाव) 70 वर्षावरील गटात 10 किलोमीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक पाच किलोमीटर चलने प्रथम क्रमांक पाच किलोमीटर धावणे तिसरा क्रमांक 800 मीटर धावण्यात तिसरा क्रमांक 400 मीटर धावण्यात दुसरा क्रमांक कर्नाटका फुटबॉल संघ प्रथम क्रमांक पटकाविला आहे.