बेळगाव जिल्ह्यात 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरविली जातात . ही संमेलने ग्रामीण भागात होत असतात . बेळगाव शहरात ही संमेलन सन 2020 पासून सुरु केले आहे . यावर्षी हे ३ रे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 8 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत संपन्न होणार आहे .
बेळगाव जिल्हातील कडोली , कुद्रेमानी , बेळगुंदी , सांबरा , उचगाव , मण्णूर , मचिगड (खानापूर ) , कावळेवाडी , प्रगतशिल लेखक संघ बेळगाव , कारदगा (निपाणी ) या सह आदी ठिकाणी ही संमेलन भरून मराठीचा जागर केला जातो .
या संमेलनाचे संयोजक यांनी बेळगाव नगरीतील या संमेलनात सर्व पदाधिकारी यांच्या सह उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील , जिल्हाध्यक्ष अॅड . सुधीर चव्हाण व महिला कार्यकारणी उपाध्यक्षा अरुणा गोजे पाटील यांनी केले आहे .