आधीच महागाईने उच्चांक गाठला असतानाच घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस दरवाढ बरोबरच व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही एकशे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे.
आजपासून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची दरामध्ये पन्नास रुपयाने वाढ करण्यात आली असून गॅस सिलेंडर चा दर 999.50 रुपये इतका झाला आहे.
तसेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात देखील 102 रुपये वाढ करण्यात झाली आहे. गेल्यावर्षी 800 रुपयाला मिळणारा घरगुती गॅसला आता यावर्षी जवळपास 1000 रुपयाला मिळणार आहे.