कित्तूर उत्सव गुरुवार दि. २३ ते शनिवार दि. २५ ऑक्टोबर अखेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवकाळात मान्यवर, शाळकरी मुले, महिला, वृद्ध आदींसह लाखो लोक सहभागी होतात. उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बुधवार दि. २२ रोजी रात्री १० ते रविवार दि. २६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कित्तूर, देवगाव व आंबडगट्टी गावांच्या व्याप्तीतील सर्व दारू दुकाने व बार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी
बजावला आहे.
बेळगाव उत्पादन शुल्क सहआयुक्त, उत्पादन शुल्क उपायुक्त, उत्पादन शुल्क उपअधीक्षक यांनी दारू दुकाने बंद असलेल्या दिवशी दारू विक्री करणाऱ्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, कर्नाटक उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुरुवार ते रविवारअखेर दारूसाठ्यात आणखी भर पडणार नाही किंवा परवाना नसलेल्या जागेत ठेवला जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचाआदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे बजावला आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ कलम ३२ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षा करण्यात येणार आहे
कित्तूर उत्सव काळात दारू-बार बंद ठेवण्याचे आदेश
