परिश्ववाडहुन खानापुर च्या दिशेने येणाऱ्या दुचाकीने गुराख्याला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नारायण तातोबा पाटील वय 65 राहणार तो होसुर तालुका खानापूर असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की जनावरे घेऊन शेताकडे जाणार्या गुराख्याला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने ठोकले. यामध्ये नारायण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटना लैला साखर कारखाना क्रॉस जवळील खानापूर पारिश्वड रस्त्यावर काल घडला. सदर अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे तसेच मृत झालेल्या शेतकऱ्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुलगे विवाहित मुलगी नातवंडे असा परिवार आहे.