आता माय बेळगाव या ॲपच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा प्रवासाची माहिती बस सेवेची माहिती घरात बसल्या बसचे लाईव्ह लोकेशन इत्यादी माहिती जनतेला फक्त एका क्लिक च्या माध्यमातून समजणार आहे. यासाठी माय बेळगाव ॲप हे विकसित करण्यात आले आहे.
शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून घरबसल्या शासनाच्या अनेक सुविधा जनतेला या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटी चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी दिली.
महापालिकेच्या नियंत्रणाखाली शहरात दररोज कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच शहरातील एक लाख दहा हजार घरांना आर एस आय डी टॅग लावण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून कचरा गोळा करणाऱ्या सर्व वाहनांवर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती विश्वेश्वरय्या नगर येथील इंटिग्रेटेड कमांड सेंटर मध्ये माय बेळगाव ॲप जनतेच्या सेवेत बहाल केल्यानंतर स्मार्ट सिटी चे एमडी प्रवीण बागेवाडी बोलत होते.
यावेळी पुढे ते म्हणाले की माय बेळगाव या ॲपच्या मदतीने ॲम्बुलन्स चे लाइव्ह लोकेशन आपण थेट पाहू शकतो तसेच चालकाला संपर्क करू शकतो या शिवाय पिण्याच्या पाण्याच्या दर्जावर देखील निगा आपण ठेवू शकत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
याबरोबरच बसेससाठी जीपीएस सोय आग आपत्ती व्यवस्थापन सिग्नल यंत्रणा कचऱ्याची योग्य विल्हेवाट इतरत्र कचरा फेकणाऱ्यांवर नजर कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठेवली जाणार असल्याची माहिती बैठकीत दिली. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व इंटिग्रेटेड कमांड सेंटर मध्ये कार्यरत असलेले कर्मचारी उपस्थित होते.