जालदार गल्ली येथील कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव आज मंगळवार, दि. १७ रोजी पी. बी. रोड येथील जयशंकर भवन येथे आयोजित करण्यात आला होता .
यावेळी विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी नऊ वाजता शहापूर नाथ पै चौकपासून शोभायात्रेला सुरुवात झाली .
यावेळी बसवाण गल्ली होसूरमार्गे जयशंकर भवन येथे शोभायात्रेची सांगता झाली .त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .
तर सायंकाळी तीन ते पाच या वेळेत विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम दैवज्ञ समाजातील सर्व महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता .