बेंगलोर अशोकनगर येथील कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय मिनी ओलंपिक फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा १४ वर्षाखालील मुलींचा संघ प्रशिक्षक मानस नायक यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाला.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मैदानावर १७ ते २० मे दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धे मुलींचा संघ सज्ज झाला आहे .
यामध्ये बेळगाव जिल्हातील १४ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ पुढील प्रमाणे आहे .युक्ता पाटील, झोया मुल्ला, अवनी सानीकोप्प, श्रावणी सुतार, दिशा, रिया हुदली, सुरभी पाटील स्तुति सवडी, सृष्टी वर्मा, तनिष्का लगाडे, सालविया गोम्स, किंजल तलवार, ममता मुल्ला, गौतमी जाधव, रिया वाके, प्रांजल हजेरी, या खेळाडूंचा संघात समावेश आहे.