एका दिव्यांग व्यक्तीला रक्ताची नितांत गरज होती. काही कारणास्तव तिच्या शरीरातील रक्त कमी झाले होते. मात्र पैशांअभावी सदर दिव्यांग महिलेवर उपचार करणे कठीण होती. यावेळी डॉक्टरांनी सदर महिलेला पाच बॉटल रक्त चढविण्याचा सल्ला दिला मात्र पैशांअभावी तिला रक्त संकलित करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत मैनाबाई फाउंडेशनच्या वतीने त्या व्यक्तीला आर्थिक मदत देण्यात आली आहे.
येथील गॅंग वाडीतील रहिवासी असलेल्या डिंपल दादू चौगुले या पायाने अधू असलेल्या महिलेला आर्थिक मदत देण्यात आली. सदर मदत मैनाबाई फाउंडेशन च्या वतीने शिवा चौगुले यांनी पाच हजार रूपये सदर महिलेकडे सुपूर्द केले.
समाजात अत्यंत गरीब व हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या व्यक्तींनी जर आपल्याला मदत हवी असल्यास त्यांनी शिवा चौगुले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवा चौगुले यांनी केले आहे.