दिनांक 16 मे २०२२ पासून शैक्षणिक काळ सुरू झाले .निमित्ताने जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेंन तर्फे पहिली ते पाचवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता.
व्यासपीठावर जायन्ट्स ग्रुप चे अध्यक्ष श्री शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी श्री मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी तसेच शाळेचे एस डी एम सी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मंडळी आणि गुरुजन वर्ग उपस्थित होते.
शाळेत शिकणाऱा प्रत्येक विद्यार्थी हा देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे कारण त्याच्यावरच संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य आणि प्रगती अवलंबून असते आणि म्हणूनच पुस्तके वाटप, वह्या वाटप करून प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाप्रती उत्साह वाढवणे हे एक राष्ट्रीय कार्य आहे आणि ते जायन्ट्स ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून होत आहे याचा अभिमान आम्हास आहे असे प्रतिपादन जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री शिव कुमार हिरेमठ यांनी या समारंभा प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी सेक्रेटरी श्री मुकुंद महागावकर व संचालक श्री धीरेंद्र मरळीहळी यांनी सुद्धा शिक्षणाप्रती महत्त्व सांगितले.यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्येने शाळेतील विद्यार्थी वर्ग, स्टाफ वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे सर्वेसर्वा श्री जी. ए. गावकर यानी केले.