यंदाच्या वर्षी शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तरचे आमदार अनिल बेनके उपाययोजना राबवित आहेत .तसेच शहरातील उत्तर भागाची पाहणी करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता सज्ज झाले आहे .
त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकरिता आणि त्यांच्या भागात विकास कामे राबविण्याकरिता उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी काल नागरिकांच्या भागात बैठक बोलावली होती
यावेळी त्यांनी शिवनगर, कणबर्गी भागात नागरिकांना कोणत्या सुविधा हव्या आहेत .आणि त्यांना कोणत्या मूलभूत गरजा हव्या आहेत याबाबत बैठक घेतली.
यावेळी त्यांनी नागरिकांशी बातचीत करून या भागात विकास कामे राबविण्याविषयी चर्चा केली. तसेच या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण पथदिवे गटारीचे काम आणि सीडीवर्कचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बसवराज येळ्ळूरकर, मनोहर मुतगेकर, अमोल मन्नोळकर, महेश सदावार, राकेश मन्नोळकर, कृष्णा सदावार, रवी, प्रभाकर मन्नोळकर, बेलगेरी व शिवनगर कणबर्गी वासी उपस्थित होते.