बेळगावात एम्स संस्थेच्या केंद्राची स्थापना व्हावी अशी मागणी बेळगावकरांनी निवेदनाद्वारे केली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. त्यामुळे ही संस्था बेळगाव मध्ये देखील स्थापन करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
काल या मागणीचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही संस्था भारतातील एक नामवंत वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र आहे. या संस्थेत सर्व प्रकाराच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया रुग्णांवर करण्यात येतात.
त्यामुळे ही संस्था बेळगाव मध्ये देखील स्थापन करावी आणि बेळगाव मध्ये असलेल्या रुग्णांना इतर राज्यात न जाता बेळगाव मध्ये उपचार करण्याकरिता या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळी सदर निवेदनाचा स्वीकार प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी केला. याप्रसंगी प्रोफेशनल फोरम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एचपी राजशेखर उपाध्यक्ष अरविंद संगोळी सचिव पी एस हिरेमठ पदाधिकारी एस वाय कुंदर्गी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते