बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित उत्तर कर्नाटक पात्रता फेरीच्या वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संघाने धारवाड जिल्हा फुटबॉल संघटनेचा संघाचा 6-2 असा पराभव करत स्पर्धेचे चॅम्पियनशिप पटकाविले.
सदर स्पर्धा कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने श्रीनगर येथे असलेल्या लढेल स्कूलच्या टर्फ फुटबॉल मैदानावर पार पडली. यावेळी या स्पर्धेत धारवाड जिल्हा संघातर्फे करवीर पवार यांने दोन गोल नोंदविले तर बेळगाव जिल्हा संघातर्फे नदीम इनामदार यांनी सलग तीन गोल करत हॅट्रिकी साधली.
यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक गिरीश आयर स्कूल संस्थेचे चेअरमन राज घाडगे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष पंढरी परब पेट्रेन सदस्य रामकृष्ण हदगल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.