बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 जून हुतात्मा दिन आणि भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना द्यावयाचे निवेदन यासंदर्भात चर्चा होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मंडळे नागरिक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे