व्यायामाचा अभाव ,चुकीचा आहार, ताणतणाव यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे .तसेच मधुमेह , ब्लडप्रेशर , अतिरिक्त वाढलेली चरबी यामुळेसुद्धा हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे या सर्व आजारांवर वेळीच उपचार निदान केल्यास हृदयरोगाचा धोका टाळता येतो .म्हणूनच माधवबाग शाखेने विशेषता मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या आजाराने त्रस्त असणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आले आहे
दिनांक 28 मे ते31मेरोजी शिवाजी गार्डन माधवबाग शहापूर शाखा येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर पार पडणार आहे.या शिबिरात मधुमेह , ब्लडप्रेशर , ऍन्जिओग्राफी , ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांसाठी खास मोफत हृदयरोग तपासणी करण्यात येणार आहे .
सदर शिबिर शनिवार दिनांक 28 मे ते बुधवार दिनांक 31 मे 2022 सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत तपासण्याची वेळ राहील या तपासणीमध्ये ब्लडप्रेशर ,ब्लड शुगर, टेस्ट व वैद्यकीय सल्ला या सर्व तपासण्या मोफत होतील. येताना जुने रिपोर्ट चालू औषध घेऊन नियोजित स्थळी यावे असे आवाहन करण्यात आले आहे .