कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या अध्यक्षपदी वैभव विलास कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कर्नाटक राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हॉटेल सन्मान मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
वैभव कदम हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच ते एक धडाकेबाज कर्तव्य तत्पर आणि आक्रमक व्यक्ती महत्त्व तसेच कृतिशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांनी फेडरेशनच्या कार्यात अनेकदा भाग घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यास सातत्याने मदत केली आहे त्यामुळे त्यांनी दिलेल्या फेडरेशनच्या कार्यातील योगदानाबद्दल त्यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी गायकवाड यांनी दिली.
कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाच्या फक्त अध्यक्षपदी नव्हे तर जिल्हा कार्यक्षेत्रातील कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजातील विविध मधील अनेकांची निवड करण्यात आली आहे.त्यात जनरल सेक्रेटरी पदी राहुल भातकांडे व सचिन कोले यांची देखील नियुक्ती केली आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच बेळगाव तालुका अध्यक्ष म्हणून गणपत पाटील यमकनमर्डी क्षेत्र अध्यक्ष म्हणून बसू लाड यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.