बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या रिक्त संचालक पदासाठी उद्या चुरशीची निवडणूक होणार आहे.
कुडची चे प्रमोद पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी सहकार खात्यातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे.
यावेळी बेळगाव ग्रामीण मधील पश्चिम बेळगाव मधून मराठा समाजासाठी कार्य करणारे किणये गावचे हेमंत पाटील व यमकनमर्डी हांदिगणुर मधून दयानंद पाटील उभे राहणार आहेत.
त्यामुळे सहकार क्षेत्रात संचालकपदी होणारी ही निवडणूक चूरशीची होणार आहे. तसेच या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे उद्याचे निवडणूकीनंतर समजणार आहे.