रेणुका साखर कारखान्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. येथील कारखान्यातील निघणाऱ्या धुरामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील सांडपाण्यामुळे देखील नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
अथणी तालुक्यातील कोकटनूर गावातील रेणुका साखर कारखान्यातील सांडपाणी घातक रसायनांचा मोकळ्या जमिनीत आणि कालव्यामध्ये सोडण्यात आले आहे.त्यामुळे विहिरी आणि बोरवेल प्रदूषित झाल्या आहेत. तसेच याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या कारखान्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आज शेतकऱ्यांनी संपत कुमार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. आणि संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली.
रेणुका साखर कारखान्यामुळे वर्षानुवर्षे पर्यावरणाची हानी होत आहे तसेच नियमांचे देखील उल्लंघन करण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे हा सर्व प्रकार थांबवावा आणि संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.