बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन च्या आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 हॉटेल पंचामृत फुडील रोड मराठा कॉलनी बेळगाव येथे काल रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी पार पडली .यावेळी या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास 160 स्केटर सहभागी झाले होत.
या चॅम्पियनशिपच्या उद्घाटन समारंभास श्री नंदकुमार मिरजकर कॉर्पोरेटर सिटी कॉर्पोरेशन बेळगाव राजू माळवडे माजी फेड जायंट्स इंटरनॅशनल अध्यक्ष, श्री त्रिवेदी, श्री गिरीश देशेट्टी, अमोल ढवळीकर, अजय सहकारी, श्री शिवराज, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटर आणि पालक उपस्थित होते.
याप्रसंगी सूर्यकांत हिंडलगेकर योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, गणेश दड्डीकर, सागर चोगुले यांनी वरील चॅम्पियनशिप आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतले.