महिला आघाडीच्या वतीने आज काकतीवेस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या बैठकीत कन्नड सक्ती विरोधात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरिता एक जून रोजी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या बेछूट गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन करण्या करिता उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील श्रद्धा मंडोळकर माला जाधव सुधा भातकांडे प्रिया कुडची अर्चना देसाई भाग्यश्री जाधव राजश्री बडमंजी मंजुश्री कोळेकर राजश्री बाबुळकर यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .