NWKRTC बेळगाव विभागाने बेळगाव विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत हवाई प्रवाशांसाठी बस सेवा सुरू केली आहे.
“एअर टू रेल आणि रेल्वे टू एअर इन बस” या ब्रँड नावाने बस सेवा प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली असून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते नवीन सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बेळगाव विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विमानतळ प्राधिकरण, रेल्वे प्राधिकरण आणि परिवहन प्राधिकरण उपस्थित होते.