शहरात लवकरच कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) द्वारे चालवले जाणारे 100 खाटांचे रुग्णालय आणि उपप्रादेशिक कार्यालय सुरु होणार आहे
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून मच्छे गावात किंवा उद्यमबाग परिसरात 5 एकर जागेत 100 खाटांचे रुग्णालय उभे राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , खासदार इराण्णा कडादी यांनी अधिकाधिक विमाधारक असलेल्या जिल्ह्यासाठी 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत . खासदार कडाडी यांनीही नवीन रुग्णालय राज्य सरकारकडे देण्याऐवजी केंद्राकडे चालवण्याची मागणी केली आहे.
तसेच आमदार अभय पाटील यांनी त्यांच्या बेळगाव भेटीदरम्यान कर्नाटकच्या कामगार मंत्री यांना किमान 30 खाटांचे ईएसआय रुग्णालयाची विनंती केली होती.
येथील अशोक नगर येथे सध्याचे ईएसआय रुग्णालय ३.१ एकर जागेत बांधले आहे. रुग्णालयाची इमारत जीर्ण अवस्थेत आहे.
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), तिरुचिरल्ली यांनी केले होते.
अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की ESIS रुग्णालयाची इमारत आणि कर्मचारी निवासस्थान मानवी निवासासाठी अयोग्य आहेत.