मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दूंडय्या नंदीकोळमठ वय 42 याचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावांमध्ये घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दूंडय्या हा हुक्केरी येथून कोण्णूर येथे आपल्या पत्नीला तिच्या माहेरी भेटण्यासाठी आला होता. यावेळी अज्ञाताने संधी साधून धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर हल्ला केला यावेळी तो गंभीर जखमी होऊन तिथेच गतप्राण झाला.
दूंडय्या हा हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असून त्याचा गोकाक येथील कोण्णूर गावामध्ये निर्घृण खुन झाला आहे. सदर खुनाचे गूढ अद्यापही गुढ असले तरी गोकाक पोलीस याचा कसून तपासकरीत आहेत.