बसूर्ते गावातील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना 30 मे रोजी घडली आहे. सदर युवतीने बेळगावला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली.मात्र ती अद्यापही घरी परतली नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. अक्षता नारायण घुमटे वय 19 राहणार बसूर्ते असे तिचे नाव असून तिचे वडिल नारायण घुमटे यांनी ही फिर्याद दिली आहे. तसेच वरील छायाचित्रातील तरुणी कुठेही आढळल्यास त्वरित पोलिस स्थानकाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बसूर्ते गावातील युवती बेपत्ता
By Akshata Naik

Previous articleधुम्रपान निषेधासाठी एनसीसी विद्यार्थिनींची जनजागृती रॅली
Next articleमानेवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला : युवक जागीच ठार