गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक प्रदेशातील नागरिकांना आता एकाच छताखाली वेगवेगळ्या कपड्याची आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या कापडाची खरेदी
येथील शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या मॉल मध्ये करता येणार आहे .
1 लाख चौरस फूट जागेत पाच मजल्यांवर पसरलेला या मॉलचे उदघाटन काल थाटात करण्यात आले .बेळगावमध्ये शुक्रवारपासून BSC या प्रदेशातील एक मोठा टेक्सटाईल मॉल कार्यान्वित करण्यात आला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा विभागातील या सर्वात मोठ्या टेक्सटाईल मॉलचे सॉफ्ट लॉन्चिंग माजी खासदार आणि KLE सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते काल करण्यात आले याप्रसंगी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मॉलचे संचालक बीसी शिवकुमार म्हणाले की “आमच्या टेक्सटाईल मॉलमध्ये कापड संबंधित कोणत्याही आणि सर्व गरजा पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही दिली.त्यानंतर ते म्हणाले की बी एस चन्नबसप्पा अँड सन्स हा 84 वर्षांहून अधिक इतिहासाचा टेक्सटाईल हेरिटेज ब्रँड आहे. ब्रँड BSC ची स्थापना 1938 मध्ये झाली आहे .तसेच बेळगाव मध्ये याचे उदघाट्न करताना अत्याआनंद होत असल्याचे सांगितले .याप्रसंगी बीसी उमापथी, बीसी चंद्रशेखर, बीसी शिवकुमार, बीयू चंद्रशेकर, बीसी विवेक, बीएस मृणाल, बीसी वेद उपस्थित होते.