आज शहरात भाजप पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल बेनके यांनी अग्निपथ योजने संबंधी स्पष्टीकरण दिले. आणि ही योजना नेमकी काय ते सांगितले
देशात विरोधी पक्षांकडून अग्निपथ योजने विरोधात निदर्शने करण्यात येत आहे तसेच युवकांना भडकवण्याचा प्रकार चालला आहे त्यामुळे या अग्निपथ योजनेचा भडका विरोधीपक्षनेते बेळगाव मध्येही उठू नये याकरिता आमदार अनिल बेनके यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले
ते म्हणाले अग्निपथ योजना नेमकी काय आहे हे विरोधी पक्षाने समजून घेतले पाहिजे. देशात बेरोजगारीची समस्या वाढली आहे त्यामुळे युवकांना रोजगार मिळावा याकरिता केंद्र सरकारने ही योजना आखली असून या योजनेमुळे युवकांना काम मिळणार असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी पत्रकार परिषदेत आमदार अनिल बेनके खासदार मंगला अंगडी एम बिजली यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते