सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून मोदेकोप या गावी जनजागृती करण्यात आली .
यावेळी या मोर्चाला गावातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहावे व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले तसेच मराठी भाषिकांनी आपल्या मराठी भाषेवरील अन्याय दूर करण्यासाठी एकत्रपणे लढावे हे हे सांगितले तसेच पांडुरंग सावंत यांनी गावकऱ्यांना पत्रका मधला आशय सांगून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले .
यावेळी मोदेकोप गावातील नागरिकाने मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचा पाठिंबा दर्शविला यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील दत्तू कुठरे राजाराम देसाई सुरेश देसाई निरंजन सरदेसाई धनंजय पाटील राजू पाटील आदी गावातील नागरिक उपस्थित होते