राकसकोप जलाशयातील असलेल्या कमी पाण्याच्या साठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सध्या राकसकोप जलाशयातील 18 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असल्याने येणाऱ्या पुढील काळात शहराला पाणी टंचाई निर्माण होणार आहे.
पावसाने दडी मारल्याने केवळ नऊ फूट पाणी राकस्कोप जलाशयाची शिल्लक राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर पाऊस न झाल्यास नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे
जर पुढील आठवड्यापर्यंत पाऊस न झाल्यास स्टोरेज मधील पाणी उपसा करून शहरवासीयांना पुरवावा लागणार आहे. मात्र हेही पाणी संपल्यास पाण्याविना दाहीदिशा फिरण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.