दक्षिण वेस्टर्न रेल्वे विभाग, केएसआर रेल्वे स्थानकाच्या फलाट नं. ५ मध्ये कूली कर्मचार्यांच्या विश्रांतीचा कक्षाचा मुसलमानांनी त्यांचे प्रार्थनास्थळ बनविले असल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
बेंगळुरू केएसआर रेल्वे स्थानक राज्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. बेंगळुरू रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक मशिदी असूनही रेल्वे स्थानकाच्या फलाटावर प्रार्थना करण्यास अनुमती देणे हे एक षड्यंत्र आहे. आज प्रार्थनास्थळ बनवून उद्या त्याचेच मशिदीत रूपांतर करण्याची शक्यता आहे; म्हणून अनधीकृत प्रार्थना स्थळाला अनुमती देणार्यांवर कारवाई करावी, असे हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी या संदर्भात समिती सहीत बजरंगदळ, राष्ट्र रक्षणा पडे, हिंदू महासभा आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बेंगळुरू येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले.
या संदर्भात बोलताना श्री. मोहन गौडा म्हणाले की, सध्या बेंगळुरू हे आतंकवाद्यांचे आश्रयस्थान झाले आहे. २०१८ला राष्ट्रीय अन्वेषण पथकाने बेंगळुरू कँटोनमेंट स्थानकात मूलतः पश्चिम बंगालचा असलेल्या आतंकवादी आदील असदुल्ला याला अटक केली होती. २०१९ला मॅजेस्टिक क्षेत्रात केंद्र अपराध विभागाच्या अधिकार्यांनी महंमद अक्रम नावाच्या आतंकवाद्याला अटक केली होती. बेंगळुरूच्या कॉटनपेटे मशिदीत आश्रय घेतलेल्या मूलतः बांग्लादेशाच्या जमात उल मुजाहिदीन संघटनेच्या सदस्याला २०२०ला पोलिसांनी अटक केली होती. असे असूनही रेल्वे स्थानकाच्या फलाटावर अन्यधर्माच्या प्रार्थनास्थळाला अनुमती देणे कितपत योग्य आहे ? तत्परतेने तेथील अनधीकृत प्रार्थनास्थळ बनविण्यास अनुमती देणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तिथे प्रार्थना करण्यास अनुमती देऊ नये. हे तत्परतेने थांबविण्यात यावे. तसे न घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे बजावण्यात आले.