बेळगावमधून 2023 च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसची प्रजाध्वनी बस यात्रा राज्यभर फिरणार आहे. 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महात्मा गांधी यांनी भूषवले होते.
बेळगाव शहराने स्वातंत्र्यलढ्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली असून 2023 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली शहरातून आज प्रजाध्वनी बस यात्रा सुरू करण्यात आली .
यावेळी बोलताना केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून दररोज नवीन भ्रष्टाचाराचे घोटाळे समोर येत आहेत.
जनता 40% कमिशन बी रिपोर्ट यासारख्या अनेक घोटाळ्यांच्या सरकारला कंटाळली आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर बस चालवण्यापूर्वी रस्त्या आधी पाणी टाकून स्वच्छ केले असल्याचे सांगितले .तसेच यामुळे सरकारचा भ्रष्टाचार प्रतिकात्मकपणे धुवून निघेल, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर, माजी मंत्री एम.बी.पाटील, यू.टी.खडेर, आर.व्ही.देशपांडे, विधान परिषद सदस्य चन्नराज केपीसीसीचे कार्याध्यक्ष तथा आमदार सतीश जारकीहोळी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनय नवलगट्टी, काँग्रेसचे माजी आमदार उपस्थित होते.