ओल्ड गांधीनगर मारुती रोड लक्ष्मी गल्ली येथे गटारीत कचरा साचरा असल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावर साचून तळे निर्माण झाले आहे. येथील गटारीची स्वच्छता करण्याकडे कानाडोळा केला असल्याने ही समस्या उद्भवली आहे.
याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
येथील गटारीत कचरा साचला आहे तसेच गवत वाढले असल्याने आणि दगड गटारीत असल्याने पाणी जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहे.
येथे रस्त्याच्या मधोमधच पाणी साचल्याने येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. तसेच शाळकरी मुले आणि वयोवृद्धांना येथून जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच रस्त्याचे काम देखील अर्धवट ठेवले असल्याने सर्व पावसाचे सांडपाणी रस्त्यावरच साचून राहिले आहे त्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी योग्य उपायोजना राबवून रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.