सर्पदंशाने आज एक म्हैस मृत पावल्याची घटना बेनकनहळ्ळी येथील एका शेतात घडली आहे. सायंकाळच्या वेळेस म्हैस चरावयास गेली असता शेतात सापाने म्हशीला दंश केल्याने तिचा जागेस मृत्यू झाला आहे.
बेनकनहळ्ळी येथील शेतकरी दीपक नारायण चौगुले यांच्या म्हशीचा साडेपाचच्या दरम्यान मृत्यू झाल्या असून या घटनेने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.