हवाई दल नैसर्गिक आपत्ती तसेच मानवनिर्मित आपत्ती काळात देशसेवा करत आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याकरिता भारतीय रेड क्रॉस सोसायटी कर्नाटक शाखेच्या वतीने रेडक्रॉस जिल्हा शाखेच्या माध्यमातून सांबरा बेळगाव येथील हवाई दल विमानतळाला 20000 विदेशी पुनर्वापर फेस मास्क देणगी दाखल आज देण्यात आले.
यावेळी भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे राज्य समिती सदस्य डॉक्टर एस बी कुलकर्णी बेळगाव जिल्हा कार्यकारी समिती सदस्य विकास कलकघगी राज्य आपत्ती निवारण सदस्य एल व्ही श्रीनिवास यांच्या वतीने हवाई दलाला फेस मास्क सुपूर्द करण्यात आला.
यावेळी एस बी कुलकर्णी यांनी आपत्ती व्यवस्थापना संदर्भात रेडक्रॉस सोसायटीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच हवाई दलाकडून देशभरात आणि विदेशात केल्या जाणाऱ्या मदतीची प्रशंसा यावेळी केली.