मॉर्निंग वॉकला जात असताना पहिले रेल्वे गेट ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर कब्बे वय 86 असे या घटनेत मृत झालेल्या वृद्धाचे नाव असून ते टिळकवाडी येथील रहिवासी आहेत.
सकाळी साडेआठच्या सुमारास मॉर्निंग वॉकच्या दरम्यान ते गेट ओलांडत असताना ट्रेनचा आवाज ऐकू न आल्याने त्यांना रेल्वेची धडक बसली आणि ते खाली पडले यावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.
सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच त्यांनी प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली आहे.