26 कर्नाटक बटालियन एनसीसी बेळगाव सेंट जोसेफ विद्यालयामधील एनसीसी छात्रांनी पर्यावरण विषयक जागृतीसाठी सायकल फेरी काढली. तसेच नागरिकांना पाणी वाचविण्यासंदर्भात संदेश दिला.
पावसाचे पाणी आपण वाया घालवितो, ते पाणी जमिनीत जिरवा. ज्यामधून पाण्याच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळता येतील असे आवाहन केले. तसेच झाडे लावा, झाडे जगवा, जगवा, आणि पाण्याचा योग्य वापर करा असेही मार्गदर्शन केले.
त्यासाठी या विद्यार्थिनींनी हातामध्ये फलक घेतले होते. या विद्यालयातील पालक आणि शिक्षक संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानिमित्ताने संचयनी सर्कल या ठिकाणी सायकल फेरी थांबवून नागरिकांना संदेश देण्यात आला. या उपक्रमासाठी रहदारी पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले.