30 जुलै रोजी म्हणजे आज होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीतील मोठ्या बदलांवर चर्चा होणार आहे. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना त्याच तारखेला आणि वेळेत पेन्शनची रक्कम मिळणार आहे.
ज्या व्यक्तींना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) दरमहा पेन्शन मिळत आहे , त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. EPFO कडून पेन्शन रकमेच्या व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. सर्व पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात येणार आहे . या प्रणालीच्या स्थापनेमुळे, देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्ती वेतन एकाच वेळी हस्तांतरित केले जाणार आहे .
सध्या EPFO ची 138 प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन हस्तांतरित करत आहेत . त्यामुळे या पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला पेन्शन मिळत आहे . मात्र आता पेन्शनधारकांना त्याच तारखेला आणि वेळेत पेन्शनची रक्कम मिळणार आहे.