भिमराव भरमा कणबरकर यांचे निधन
मूळचे होसूर बसवाण गल्लीतील व सध्या शास्री नगर,११ वा क्रॉस येथील भिमराव भरमा कणबरकर (वय ८२) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (ता. २४) निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन कन्या, सुन, नातवंडे असा परिवार आहे.गोवा राज्यातील निवृत्त शिक्षक व म. ए. समिती निष्ठवान कार्यकर्ते व सीमआंदोलनात तुरुंगातवासही भोगला आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार (ता.२५) शहापूर स्मशानभुमी येथे होणार आहे